आनंदसागर

शेगांवात सर्वत्र असलेले पाण्याचे दुर्भिक्ष पाहतां. जर परिसरातील तलाव पाण्याने भरुन राहिला तरच गावातील पाण्याची गरज भागू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असतां, संस्थानने मन नदितून पाणी आणून या तलावात सोडण्याची योजना हाती घेतली. दोन कोटीहून जास्त या योजनेत दर महा होणारा पन्नास लाखांपर्यंतचा खर्च संस्थानच्या आर्थिक कार्यक्रमांमध्ये न बसणारा असा. 

तेव्हा या तलावास मध्यवर्ती ठेवून त्याच्या आजूबाजूचा परिसर विकसीत केला असतां व तेथे अध्यात्मिक केंद्र तसेच मनोहारी उद्यान निर्माण केल्यास येणाऱ्या महसुलातून पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवता येईल या हेतूने आनंदसागर प्रकल्पाची निर्मीती झाली.

..........................................................................................................................................................................................................................................

आनंदसागर लोकार्पण सोहळा

श्रीगजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या ‘आनंदसागर‘ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कवाडं खुली झाली ती ‘आनंदसागर लोकार्पण सोहळया‘ दिवशी. आदरणीय उपराष्ट्रपती श्री. भैरोसिंगजी शेखावत यांच्या शुभहस्ते ‘आनंदसागर‘ हे पृथ्वीवरील सुवर्ण वैभव तमाम जनतेसाठी खुलं झालं. हे वैभव लुटण्यासाठी आतुर असलेल्या त्या विराट जनसमुदायाची अवस्था मात्र ‘आनंद पोटांत माझ्या मावेना‘ अशीच होती. प्रत्येकाच्या डोळयातून हा स्वर्गसुखाचा सोहळा ‘पारिजातकाचा सडा‘ होवून पसरला आणि काही क्षणांतच हा जनसागर ‘आनंदसागर‘ होऊन गेला.

पर्यावरण व पाण्याची समस्या निवारण करतानांच धर्म व विज्ञान यांच्या समन्वयासोबत आधुनिक व प्राचिन संस्कृतीचे दर्शन घडेल या हेतूने अध्यात्माच्या पायावर रचलेल्या वैभवशाली हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवीतांना, मानवी मनाला उल्हासीत करणारे एक प्रेक्षणिय स्थळ आनंदसागरच्या रुपाने स्थापन झाले, आसेतु हिमाचल पसरलेली आपली वैभवशाली आध्यात्मिक परंपरा, हिंदु संस्कृ ती व संतवैभव यांचा एकत्रित मनोहारी संगम भाविकांच्या थेट हृदयाला भिडणारा असा. येथे येणारा प्रत्येक भाविक आनंदसागरचे अद्भूत निसर्ग वैभव व त्यामागील प्रेरणा असलेले संस्थानचे दूरगामी धोरण पाहून नतमस्तक होतो व त्याची ‘देता किती घेशील दो कराने ‘ अशी भावना होते. 

नजरेतही साठविता न येणारे, उत्कृष्ट कलाकृतींच्या अजोड कारागीरीने मन थक्क करणारे असे आनंसागरचे भव्य प्रवेशद्वार. विविध रंगाची मनमोहक पखरण करणारी रंगीबेरंगी फुले पहात, सभोवताली चाफ्यांच्या फुलांचा मंद दरवळ घेत आपण या प्रवेशद्वारातून आत शिरतो ते पावलांपावलांवर आश्चर्याने थक्क होण्यासाठीच.

..........................................................................................................................................................................................................................................

संत मंडप

प्रवेशव्दारातून खाली येताच समोर आनंदसागर परिसराचे विस्तीर्ण क्षेत्र दिसते. आजुबाजूस गच्च व गर्द झाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, कारंज्यातून उसळणारे व लयबध्द स्वरात झुळझुळणारे पाणी सोबत घेऊनच आपण विस्तीर्ण अशा संतमंडपात प्रवेश करतो. या अर्धवर्तुळाकार, भव्य अशा संतमंडपात १८ राज्यातील १८ संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत. मध्यभागी विस्तीर्ण परिसरात कारंज्यातून उसळणाऱ्याा पाण्यांचे तुषार अंगावर झेलीत प्रसन्न भावमुद्रेत बसलेली श्री गजानन महाराजांची भव्य मुर्ती मन मोहून नेते . आद्य शंकराचार्य, मिराबाई तसेच संत कबीर, ताजुद्दीनबाबांपर्यंतचे विविध राज्यातील संत व त्यांची उद्बोधक वचने येथे पहावयास मिळतात.

श्री संत मंडपा मधील वचने

१) श्री संत भीमा भोई :- (ओरीसा)
मुझे भलेही नरक मीलने दो
मगर जगतका कल्याण हो!
२) श्री धुनिवाले दादाजी :- (मध्यप्रदेश)
प्रसन्नता सम स्वास्थ नही
अनासक्ति सम मस्ती नही ।।।
३) संत तीरुवल्लूर :- (तामीळनाडू)
पत्नी घरकी लक्ष्मी है! जीस घरमें यह लक्ष्मी आनंदमें रहती है, वहाँ सभी ऐश्वर्य इकठ्ठा हो जाते है!
४) श्री संत मिराबाई :- (राजस्थान)
भवभगत भूषण सजे शील संतोष सिंगार
ओढी चूनर प्रेमकी गिरधरजी भरतार।।।
५) संत जलाराम बाप्पा :- (गुजराथ)
भुखे को अन्न, प्यासे को दो पानी।।
इसीसे बढकर पुन्य नही बात मैने जानी।।
६) भगवान महावीर :- (बिहार)
सत्यवादी मनुष्य माता की तरह विश्वसनीय
जनताके लिए गुरु की तरह पूज्य और
स्वजन की भाँति सबको प्रिय होता है।!
७) श्री विष्णूतीर्थ :- (हरियाणा)
जहाँ पर बुध्दी-विचार का अंत होता है, 
वहीं से धर्म का आरंभ होता है।।
८) श्री आद्य शंकराचार्य :- (केरळ)
इतर सर्व नाती तुटली तरी जन्मदात्या आईचे नाते कधीच तुटू देऊ नका.
९) श्री माणिकप्रभु महाराज :- (कर्नाटक)
सभी धर्म को अच्छा देखों।।
उसमें जो अच्छा है उसका सत्वांश ग्रहण करो‹ !
१०) श्री मदर मेरी :- (नाझरेथ)
अपने पडोसी पर वैसा ही प्यार करो।।
जैसा अपने आप पर करते हो।।
११) श्री ताजुद्दीन बाबा:- (महाराष्ट्र)
मानव धर्म मेरा धर्म है और उसीका मै आशिक हूं !
१२) श्री गोरखनाथ :- 
ब्रह्मांडमें जो है वही सब पींडमे है!
१३) श्री राघवेन्द्र स्वामी :- (कर्नाटक)
प्यारे भारत के सभी बासिंदो
गुस्सा मत करना जाहिदो रिंदो।।
नाम तो ले रहे धर्म का तूम।।
काम करते अदना दास का तूम।।।
१४) श्री रमण महर्षी:- (अरुणाचल)
सर्व धर्म समभाव बढावे।।
एकता समाज में फलाये।।
ब्रह्म सुखमेंही दुनीया डोले।।
संतोकी मनिषा यही बोले।।
१५) श्री भगवान गौतमबुध्द :- (बिहार)
हत्या,चोरी, निंदा ना करो, सदाचारी बनो !
१६) श्री संत कबीर :- (उत्तरप्रदेश)
कबीरा जब हम पैदा हुए, जग हँसे हम रोए !
ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रोए।।।
१७) श्री संत तूलसिदास :- (उत्तरप्रदेश)
गोधन, गजधन, बाजिधन और रतन धनखान।।
जब आवें संतोष धन, सब धन धुरी समान।।।
१८) श्री स्वामी रामतिर्थ (राम बादशहा) :- (पंजाब)
हमे शिक्षा मे चरित्र, विज्ञान मे मानवता ।।
राजकारण मे नीतीमत्ता, सधनतामे परिश्रम
व्यवसाय मे सचोटी, आनंद मे विवेक
तथा उपसना मे त्याग चाहिये।।
..........................................................................................................................................................................................................................................
१) चैतन्य महाप्रभु :-
ङ्घ ईश्वर और संतोका सहारा लेवे।।
जिससे उध्दार स्वयं का होवे।।
संत ग्रंथथोकी इसमें महती ।।
पावे मानव इसीसे तृप्ती ।।
ङ्घ स्वत: अमानी रहो, दुसरोंका मान रखो
और सदा श्रीहरि का संकीर्तन करो!
२) समर्थ रामदास स्वामी :-
जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे।।
 
३) श्रीमद आद्य शंकराचार्य :-
ना देखे पंथ ना भेद।।
ना खोजो किसी मे छेद ।।
मंदिर निर्माण हो ऐसा।।
सब इन्सान को मिला प्यार ऐसा।।
४) संतमूर्ती श्री रमन महर्षी :-
जैसा समाज आपको अभिप्रेत है,
या बनाना चाहते हो,
वैसे आप स्वयं रहे !
  
श्री गणेश मंदीर संत दर्शन पार्क (स्वामी समर्थ लॉन)
१. श्री संत नरसी मेहता २. श्री संत बसवेश्वर महाराज
३. श्री स्वामी समर्थ  ४. श्री महर्षी वेद व्यास
५. श्री संत गुलाबराव महाराज ६. श्री संत अरविंद घोष
७. श्री संत जब्बार बाबा ८. श्री संत साईबाबा
९. श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
 
श्री साईबाबा लॉन
१. श्री संत लिंगनाथ महाराज २. श्री संत स्वामी विवेकानंद
३. श्री संत स्वयंप्रकाश महाराज ४. श्री संत साईबाबा
५. श्री संत पुरंदरदास महाराज ६. श्री संत गाडगेबाबा
७. महामानव श्री बाबा आमटे ८. श्री संत तुकारामदादा गिताचार्य
 
श्री ध्यान मंदीर
१. श्री रामकृष्ण परमहंस(मेघडंबरी)  २. श्री गणेश मुर्ती
३. श्री रिध्दी मुर्ती ४. श्री सिध्दी मुर्ती
५. श्री स्वामी विवेकानंद ६. श्री चैतन्य महाप्रभू
७. श्री हनुमानजी ८. श्री संत तुलसीदास
९. श्री संत रोहीदास १०. श्री संत नारदमुनी
तलाव  बंधारा
१. श्री अज्ञात ऋषी (हिमालयातील)  १. श्री शिवाजी महाराज
२. श्री त्रिमुर्ती (बेट) २. श्री तानाजी महाराज
३. श्री कालीया मर्दन प्रसंग 
 
स्वामी विवेकानंद गेट
१. श्री संत गजानन महाराज २. श्री स्वामी विवेकानंद
३. श्री नंदी ४. समई

..........................................................................................................................................................................................................................................

नवग्रह मंदीर/ खुलारंगमंच 

१.श्री महाराणा प्रताप 
२.श्री समर्थ रामदास स्वामी 
३.श्री राणा सांगा भिल्ल 
४.श्री संत तुकाराम महाराज
५.श्री शिवाजी महाराज 
६.श्री संत ज्ञानेश्वर महाराज
७.श्री स्वामी विवेकानंद
८.श्री पठाण तोपची
९.झांशी की राणी लक्ष्मीबाई

आनंदसागरचा भव्य परिसर पाहणाऱ्यांसाठी संस्थानने ठिकठिकाणी थंड पाण्याची सोय केली आहे तसेच उन्हापासून संरक्षण करणाऱ्याा छत्र्यांची विनामुल्य विशेष व्यवस्था केली आहे. आनंदसागरचा भव्य परिसर सहजतेने पहाण्याचा आनंद विकलांगांनाही लुटता यावा यासाठी संस्थानने खास व्हील-चेअर्सची सोय करून दिली आहे. त्याचबरोबर या परिसरात रममाण होणाऱ्याा लहानग्या बाळांसाठी बाबागाड्यांची सोय उपलब्ध करून देताना संस्थान, प्रत्येक व्यक्तीचा अगदी सुक्ष्मपणे व जिव्हाळ्याने कसा विचार करते याची झलक आपणांस पहावयास मिळते, शिवाय छोट्या रेल्वेगाडीत बसून पूर्ण परिसराचे अवलोकन करता येते.

 

वास्तविक पाहतां वैदर्भीय भूमीवर निसर्गाचे तसे दुर्लक्षच झाले आहे. पर्जन्यवृष्टीचा अभाव व वातावरणातील दाह यामुळे एकंदरच हा परिसर रखरखीत भासणारा. मात्र स्वकर्तृत्वाने या निसर्गासही आपलेसे करून मानवी हातांनी या दगडांमधून घडवलेली शिल्पे व उजाड मातीमधून फुलविलेल्या बागा म्हणजेच जणू जिवाशिवाचे अद्भुत मिलनचं. याच भूमीतील तलावाच्या काठावर संस्थानने ‘आनंदसागर‘ नावाचं एक अशक्यप्राय असं स्वप्न पाहिलं, स्वत:च्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगत ते साकारलं आणि पाहतां पाहतां सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपाशिर्वादाने पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.

विश्रांती स्थळ

आनंदसागरच्या नयनरम्य परिसराचा आस्वाद घेतांना अधून मधून विश्रांतीची आवश्यकता भासते अशा वेळेस पाय आपसुकच विश्रांतीस्थळाकडे वळतात. आनंदसागरमध्ये जागोजागी अप्रतिम कलाकुसर असलेली, नक्षीदार खांबांनी सजलेली विश्रांतीस्थळे पहावयास मिळतात. व्दारकाबेट तसेच श्री विवेकानंद ध्यानकेंद्र येथे जाण्याच्या मार्गावर अशाच प्रकारची विश्रांतीस्थळे उभारली आहेत. येथे विश्रांतीसाठी लाकडी बाकडे ठेवली असून आजूबाजूचा परिसर गर्द लता, वेलींनी आच्छादलेला असून सभोवताली दिसणाऱ्याा रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांकडे पहाताक्षणीच शरीराला आलेला थकवा नाहीसा होतो व मरगळलेल्या पावलांना नवी उभारी मिळून पाय आपसूकच लगबगीने ध्यानकेंद्राकडे आकर्षिले जातात.

 

आनंदसागर या मनोहारी उद्यानाचा पाया अध्यात्मिक वारसा व उच्च वैभवशाली हिंदु संस्कृतीवर आधारीत आहे हे आपणांस पावलोपावली जाणवते. राज्यातील तसेच जगभरातील विविध संप्रदायातील संत, महंतांचे पुतळे जागो-जागी उभारण्यात आले आहेत. संस्कृति व संस्कार यांचे महत्व अधोरेखित करणाऱ्याा वचनांचे फलक आपले ज्ञान अधिक समृध्द करतात. येथील उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेली मंदिरे. श्रीगणेश मंदिर, श्री शिव मंदिर, नवग्रह मंदिर आदि महान देवतांची आकर्षक अशी ही मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा एक अजोड नमूनांच ठरावा. अप्रतिम कलाकुसर, नक्षिदार खांब व आकर्षक कोरीव कमानी असलेली ही शिल्पे पाहून त्यांना दगडातून साकार करणाऱ्याा त्या अनामिक शिल्पकाराच्या कलेला दाद देण्यासाठी हात नकळतचं जोडले जातात.

 

झुलता पुल 

निसर्ग व मानव एकत्र आल्यावर काय घडू शकते यांचे प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर द्वारकाबेटाकडे आपणांस नेणारा झुलता पुल पाहावांच लागेल. तलावावर उभारलेल्या लांब लचक पुलावरुन जात असता रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आपल्या मंद सुगंधाची पखरण करत आपली साथसोबत करतात आणि आपण पोहचतो या झुलत्या पुलापासी. डौलदार पिसारे फुलवणारा मत्त मयुर व चंदेरी झळाळी ल्यायलेल्या मासोळ्या यांची प्रतिके असलेला हा झुलता पुल आपल्याला थक्क करुन सोडणारा. शेगांव सारख्या आडवळणी गांवी मोठमोठ्या शहरातूनही अभावानेच आढळणारी ही कारागिरी नक्कीच कौतुकास्पद व उत्स्फूर्तपणे दाद देण्याजोगी

 

स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र

अम्रुर्त तत्वाला चिरंजिवित्व बहाल करुन निर्माण होऊ घातलेल्या ‘आनंदसागर ‘ या पृथ्वीवरील नंदनवनाच्या अद्वितीय कलाकृतीचा परमोच्च बिंदू म्हणजे स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र. ‘ध्यान साधनेतून परमार्थ‘ ही नवी तत्वप्रणाली उभ्या जगाला देतांना स्वामीजींनी प्रत्येक भाविकाला मोक्षाच्या चरणसीमेपर्यंत सहजतेने आणलं. आनंदसागरचे स्वर्गीय वैभव अष्टदिशांमधुन पहातांना थक्क झालेलं आपल मन येथील ध्यानकेंद्रातील शांत व मंगलमय वातवरणात पवित्र होतं यात शंकाच नाही. 

आपल्या मनातील शातंता व स्थैर्य आणि स्वामीजींच्या चेहऱ्या वरील शांत, नितळ व स्निग्ध भाव याचं अद्वैत साधलं जातं आणि आनंदसागरच्या रम्य वातावरणात डूंबून गेलेल मन पृथ्वीवर सहजरीत्या मिळणाऱ्या या स्वर्गसुखांतच रममाण होतं.

 

मत्स्यालय

संतमंडपातून उजव्या बाजूस थोडे अंतर चालून गेल्यावर एका विस्तीर्ण परिसरात उभे असलेले मत्स्यालय दिसते. भारतात आढळणाऱ्यां शोभीवंत माशांच्या विविध प्रजाती तसेच मोठे मासे, कासव आदि या मत्स्यालयात पहावयास मिळतात. अंधाऱ्या गुहेचा आभास करुन देणाऱ्यां या मत्स्यालयातील बोगद्यांमध्ये असलेल्या छोटया-मोठ्या पोकळ्यांतून विद्युत झोतात दिसणारे हे रंगीबेरंगी लहान-मोठ्या आकाराचे मासे पाहून बच्चे कंपनीस, आपण एखाद्या वेगळ्याच जल-विश्वात आलो असल्याचा भास न झाला तर नवलचं.

 

बालोद्यान

संतमंडपाच्या डाव्या बाजूस बालोद्यान असून येथेही झोपाळे, घसरगुंड्या, रोलरकोस्टर, यासारखे नानाविध अत्याधुनिक खेळांचे प्रकार लहान मुलांना उपलब्ध करुन दिले गेले आहेत. विस्तीर्ण अशा या परिसरात एका वेळेस हजारो मुले खेळु शकतील इतके खेळांचे प्रकार व सुविधा उपलब्ध असून हा परिसर झाडा-झुडपांनी व लता-वेलींनी आच्छादलेला आहे. येथे लहानच काय तर मोठ्यानांही क्षणभर आपले वय विसरुन खेळण्यातला आनंद लुटावासा वाटतो व क्षणभर ‘बालपण‘ मुक्तपणे उपभोगावसं वाटतं.

आनंदसागरच्या रमणीय परिसरामध्ये लक्ष वेधून घेतात ती जागोजागी आढळणारी अप्रतिम शिल्पे. विविध देवी-देवता, संत-महंत, महापराक्रमी योध्दे इतकेच काय तर प्राणीमात्रांचीही जिवंत भासणारी शिल्पे, आपणांस थक्क करुन सोडतात. इथल्या मातीत जन्मलेल्या या कलाकारांच्या या कौशल्याला, देवदत्त प्रतिभेला संस्थानने आत्मविश्वासाचे पाठबळ दिले व प्रोत्साहित केले आणि पाहतां पाहतां या विश्वकम्र्याच्या वंशजांनी पृथ्वीवर आनंदसागरच्या रुपाने ‘मयसृष्टी‘ निर्माण केली. 

कोरीव कलाकुसरीने नटलेल्या कमानी, शैलीदार पध्दतीचे आखीव-रेखीव खांब यामधून आपल्यातील दैवी प्रतिभेचं जन्मजात लेणं चोहोअंगांनी उधळणाऱ्या या शिल्पकारांनी ‘आनंदसागर‘ च्या रुपाने जे शिल्प प्रत्यक्षात साकार केलं त्याचं वर्णन फक्त एकाच वाक्यात करता येईल, ते म्हणजे ‘न भूतो न भविष्यती‘.

 
   अ‍ॅम्पी थिएटर 

देशातील काही मोजक्याच ठिकाणी आढळणाऱ्या खुल्या रंगमंचापैकी एक रंगमंच आनंदसागरच्या परिसरामध्ये उभा राहिला आहे. अद्ययावत ध्वनी व प्रकाशयोजना तसेच विस्तिर्ण रंगमंच लाभलेला हा अ‍ॅम्पी थिएटरचा परिसर लक्षात राहतो तो त्याच्या भव्यतेमुळे. येथे धार्मिक, अध्यात्मिक स्वरुपाचे कार्यक्रम तसेच किर्तन- प्रवचनादी संस्कृतीदर्शक सादरीकरणाचे प्रयोग व्हावेत आणि त्याव्दारे भाविकांना आपल्या उच्च व सामथ्र्यशाली हिंदु संस्कृतीचे आकलन व्हावे हा यामागचा संस्थानचा हेतू आहे. 

या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये बैठक व्यवस्था करतांनाही सिमेंटची बाके किंवा प्लस्टिकच्या खुच्र्यांमुळे येणारा रुक्षपणा टाळून चक्क ही उतरती बैठक व्यवस्था हिरवळीने आच्छादलेली आहे. या बैठकींच्या उंच कमानीवर संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद आदि संताचे तसेच श्री छत्रपती शिवराय व राणा प्रताप यांसारख्या अनेक महापराक्रमी वीरांचे पुतळे उभारले आहेत.

 

भोजनव्यवस्था,कॉफीहाऊस

या भव्य परिसरामध्ये येथे येणाऱ्या सर्वांच्या क्षुधाशांतीसाठी अनेक उपहारगृहे, कॉफीशॉप्स यांची व्यवस्था केलेली आहे. या उपहारगृहामधून नाश्ता, चहा, कॉफी, सरबत तर मिळतेच शिवाय विविध प्रांतातील वैशिष्ट्य जपणाऱ्या खाद्यपदार्थाची चवही चाखावयास मिळते. आनंदसागरच्या प्रवेशव्दारापाशी भोजनकक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तसेच आनंदसागर परिसरामध्ये असलेल्या भव्य व विस्तृत भोजनकक्षामधून आपण भोजनाचा आनंद घेऊ शकतो. आनंदसागरच्या प्रवेशव्दारापाशी भव्य पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली असून एकाच वेळेस शेकडो वाहने येथे विनासायास उभी राहू शकतात.

आनंदसागरला मागील वर्षी २४,५५,६८५ भक्तांनी भेट दिली आहे.

 

।। श्री ।।

विज्ञान प्रयोगातून विकसीत होते
विज्ञानासाठी साधने वापरली जातात
विज्ञानामध्ये शोध आहे
विज्ञानामध्ये तत्व परिक्षा आहे
विज्ञानामध्ये व्यासंग आहे.
विज्ञानामध्ये कर्तुत्व आहे.
विज्ञानामध्ये शक्ती आहे.
विज्ञानामध्ये प्रकल्प आहेत.
विज्ञानामध्ये तंत्रज्ञान आहे.
विज्ञान उपभोगास पोषक आहे.
विज्ञानामुळे पुरूषार्थ घडतो.
विज्ञानामुळे प्रतिष्ठा वाढते
विज्ञानामुळे संपन्नता प्राप्त होते
विज्ञानामुळे प्रसिध्दी मिळते
विज्ञानामुळे परिस्थीती बदलते.
विज्ञानामुळे चातुर्य विकसीत होते.
विज्ञानामध्ये तपशिलावर भर आहे.
विज्ञानामध्ये पराक्रम आहे.
विज्ञानामुळे नवसृष्टी विकसीत होते.
विज्ञानामुळे भौतीक विकास होतो.
विज्ञानामुळे बाह्य सुख प्राप्त होते.
विज्ञानामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात
विज्ञानामुळे पर्यावरणाचे नुकसान होते.
विज्ञानामुळे भौतीकता सुधारते
विज्ञानामुळे धन निर्माण होते
विज्ञानाकरीता उपकरणाची आवश्यकता.
विज्ञानामुळे मस्तकाचा विकास होतो.
विज्ञान हव्यासाची पेरणी करते.
विज्ञान आमचा विश्वास आहे.
विज्ञानामुळे कार्यास चालना मिळते.
विज्ञानामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळते.
विज्ञानामुळे स्वार्थ निर्माण होतो.
विज्ञानाची वाटचाल सर्वनाशाकडे जाते.
विज्ञानामुळे नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होते.
विज्ञानामुळे क्षणिक आनंद मिळतो.
विज्ञानामुळे जीवनाला गती मिळतो.

आध्यात्म योगातून प्राप्त होते
आध्यात्मासाठी साधना वापरली जाते
आध्यात्मामध्ये बोध आहे
आध्यात्मामध्ये सत्व परिक्षा आहे
आध्यात्मामध्ये सतसंग आहे.
आध्यात्मामध्ये दातृत्व आहे.
आध्यात्मामध्ये भक्ती आहे.
आध्यात्मामध्ये संकल्प आहे.
आध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे.
आध्यात्म त्यागास पोषक आहे.
आध्यात्मामुळे परमार्थ घडतो.
आध्यात्मामुळे निष्ठा वाढते.
आध्यात्मामुळे प्रसन्नता प्राप्त होते.
आध्यात्मामुळे सिध्दी मिळते.
आध्यात्मामुळे मनस्थीती बदलते.
आध्यात्मामुळे चारित्र्य विकसीत होते.
आध्यात्मामध्ये तप व शिल यावर भर आहे.
आध्यात्मामध्ये आत्मसंयम आहे.
आध्यात्मामुळे नवसृष्टी विकसीत होते.
आध्यात्मामुळे आत्मीक विकास होतो.
आध्यात्मामुळे अंतरआत्म्यातून सुख प्राप्त होते.
आध्यात्मामुळे सर्व प्रश्न सुटतात.
आध्यात्मामुळे पर्यावरणाचे रक्षण होते.
आध्यात्मामुळे नैतीकता सुधारते.
आध्यात्मामुळे समाधान निर्माण होते.
आध्यात्माकरीता अंतकरणाची आवश्यकता.
आध्यात्माकरीता सर्वांगाचा विकास होतो.
आध्यात्म ध्यासाची पेरणी करते.
आध्यात्म आमचा श्वास आहे.
आध्यात्मामुळे स्व धर्मास चालणा मिळते.
आध्यात्मामुळे अहिंसेला प्रोत्साहन मिळते.
आध्यात्मामुळे परमार्थ निर्माण होतो.
आध्यात्माची वाटचाल सर्वोेदयाकडे जाते.
आध्यात्मामुळे नैसर्गिक साधन संपत्ती पुष्ट होते.
आध्यात्मामुळे कायम स्वरूपाचा आनंद मिळतो.
आध्यात्मामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते.