श्री संस्थेची अधिकृत शाखा 

श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी
श्री क्षेत्र ओंकारेश्वर श्री क्षेत्र गिरडा श्री क्षेत्र कपिलधारा, ईगतपूरी, नाशिक
 

...............................................................................................................................................................................................................................................

श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र शाखा अडगांवशेगांवहून तेल्हारा रस्त्याने हिवरखेड मार्गे आकोट येथे जाताना आपणास ‘अडगांव‘ गाव लागते. येथेच महाराजांनी आपल्या प्रिय शिष्यास ‘भास्कर पाटील‘ यांस समाधी देववीली (संदर्भ-अध्याय ११ वा) निसर्गरम्य असे हे अडगांव पाहताक्षणीच प्रेमात पडण्यासारखे ठिकाण आहे. निसर्गाने हिरवाईची मुक्त उधळण अडगाववर केली आहे. हिवरखेड मार्गे आपण शेगांवहून खाजगी वाहन किंवा एस. टी. मार्फत साधारण ७५ किलोमीटर्सचे अंतर पार करून अडगाव येथे जाऊ शकतो. अडगाव गावाकडे डाव्या हातास महामार्गावर श्री भास्कर पाटील यांची समाधी आहे. येथे त्यांचे समाधी मंदिर उभारले आहे. या मंदिराचे 

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव मध्ये विलीनीकरण केले आहे. श्रीदासगणूंनी ज्या व्दारकेश्वराच्या रमणीय परिसराचे वर्णन अध्याय ११ वा मध्ये केले आहे तो परिसर श्री भास्कर महाराज समाधीचे शेजारी असून अजूनही तेथे चिंच, आम्रवृक्ष व पिंपळासारख्या महाकाय वृक्षांनी आसमंत बहरलेला आहे. ज्या सतीचे समाधी शेजारी भास्कर पाटील यांचा देह ठेवला होता ते ठिकाण आपणांस पहावयास मिळते. याच व्दारकेश्वराच्या रम्य परिसरात जेवणाची पंगत बसली असता कावळ्यांनी अतोनात त्रास दिला होता व महाराजांच्या सुचनेनुसार या आसमंतात कावळे फिरकले नाहीत. हा रम्य परिसर त्या सर्व प्रसंगाची आपल्या मनात उजळणी करतो.

श्री भास्कर पाटील यांच्या समाधी मागे श्री विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. येथे सभामंडप, धर्मशाळा, व्याख्यानगृह, पाठशाळा, स्नानगृह, श्रीगजानन महाराज उद्यान उभारले गेले आहे. येथे धर्मकार्ये केली जातात. महायज्ञ, कीर्तन, प्रवचन, भजन, ग्रंथपठण असे अनेक उपक्रम येथे आयोजित केले जातात.

आकोटपासून १२ किमी अंतरावर असलेल्या पवित्र ठिकाणी श्री भास्कर महाराजांच्या समाधी बरोबरच श्रीव्दारकेश्वर, श्रीशंकरेश्वर, पार्वतीमाता, सतीची मंदिरे, सिद्धेश्वर, अजानवृक्ष वाटीका इ. पवित्र दर्शनीय स्थळे आहेत.