शंका समाधान 

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (शंका समाधान )

१. श्रींचे मंदिर उघडण्याची व मंदिर बंद होण्याची वेळ कशी आहे ?
श्रींचे मंदिर सकाळी ५ वाजता उघडते व रात्री ९.३० वाजता शेजारती नंतर दर्शनबारीमध्ये् भक्त असे पर्यंत मंदिर सुरू असते व नंतर मंदिर बंद करण्यात येते. 

२. श्रींकरीता सोबत आणलेले देववस्त्र, विविध पूजा साहित्य, नैवेद्य कोठे द्यावे लागेल ?
श्रींचे दर्शनाकरीता जात असतांना सोबत आणलेले पूजा साहित्य दर्शनबारीमध्ये एक स्वतंत्र विभाग आहे, त्या ठिकाणी नोंद करून जमा करण्याची व्यवस्था केलेली आहे.

३. श्री महाप्रसादाची वेळ किती आहे ?
महाप्रसाद भक्तांना दररोज सकाळी १०.०० ते १.०० पर्यंत संस्थान तर्फे विनामूल्य वितरीत करण्यात येतो. महाप्रसादाची वेळ सकाळी १० ते १ पर्यंत असली तरी प्रतिक्षालयातील शेवटचा भक्त असेपर्यंत महाप्रसाद वितरण सुरु असते.

४. अभिषेक करण्याकरिता काय पध्दत आहे व वेळ किती आहे ?
अभिषेकाची वेळ सकाळी ५:३० ते ८:०० अशी आहे. देणगी काउंटरवर अभिषेकाकरिता देणगी पावती घेवुन या वेळात आपल्याला अभिषेक करता येईल.

. भक्तनिवास करिता खोलीची नोंदणी कोठे करावी लागते ?
भक्तनिवास करीता खोलीची नोंदणी त्या त्या भक्तनिवास काउंटरवर करता येईल.


८. श्रींचे पालखीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास कसे घेता येईल ?
गुरूवार, दशमीला तसेच उत्सवाप्रसंगी श्रींच्या पालखीची परिक्रमा संपन्न होते. त्यावेळी आपणाला पालखीचे दर्शन घेता येईल. 

. श्रींचे मंदिरात असणारे दैनंदिन (नैमित्तिक) कार्यक्रम कसे आहेत ?
आपण दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी बटण प्रेस करून पाहु शकता

१०. वाङ्मय विभागात वितरणासाठी संस्थेचे उपलब्ध वाङमय कोणते ?
आपण वाङ्मय ह्या ठिकाणी बटण प्रेस करून पाहू शकता..