श्री दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना व शासन निर्देशीत मार्गदर्शक सूचना आणी भाविकांसाठी उपलब्ध व्यवस्था.

१. श्री भक्तांनी दर्शनाकरीता येतांना श्री ई - दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणावे.

२. ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट/ॲन्ड्रॉईंड फोनवरुन ई - दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी श्री ई- दर्शन पास/पासचा आय.डी. क्रमांक सोबत आणावा.

३. श्री दर्शनार्थी भाविकांनी ई - दर्शन पास काढतांना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे/नोंदविणे गरजेचे आहे..

४. प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई- दर्शन पास असणे बंधनकारक राहील.

५. श्रींचे दर्शनाकरीता एक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करुन घ्यावी.

६. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता श्री महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरु आहे.

७. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

८. प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९,००० भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल.

९. श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करणे बंधनकारक राहील.

१०. हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती, इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये.

११. ६ फुटाचे सामाजिक/सुरक्षीत अंतर ठेवावे लागेल.

१२. शासनाचे निर्देशानुसार १० वर्षाचे आतील व ६५ वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांनी व रेड झोन, कन्टेंन्मेंट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी श्रींचे दर्शनाकरीता येऊ नये.

१३. श्रींचे दर्शनाकरीता निःशुल्क ई-दर्शन पासची सुविधा श्री संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) - www.gajananmaharaj.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (नेट, कॅफे, सेतू, स्मार्ट फोनवरुन सुध्दा ई - दर्शन पासची सुविधा उपलब्ध करुन घेता येईल.)

टिप -  श्री दर्शन सुविधा ही निःशुल्क आहे, कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी.
 भक्तनिवास संकूल व विसावा भक्तनिवास संकुल आणि आनंदविहार भक्तनिवास संकूल येथे भाविकांकरीता निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था नियमानुसार उपलब्ध आहे.