वाडेगांव-बाळापूर परिसरामधून काळा दगड आणून अत्यंत कलाकुसर पूर्ण मंदिराची निर्मिती शिल्पकार- कै. किसन मिस्त्री व कै. खंडू मिस्त्री, नागपूर यांनी केली. समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त संगमरवरी पाषाणांत मंदिराचे नूतनीकरण व रुंदिकरण करण्यात आले.
पहिल्या
विश्वस्त
सभेत
'श्रीं' नी
घालून
दिलेले
नियम आजही
अंमलात
आहेत. ते - श्री गजानन महाराज संस्थानची स्थापना श्री
गजानन
महाराज
संस्थानचे
सर्वात
महत्वाचे
वैशिष्ट्य
म्हणजे
श्री गजानन
महाराजांचे
समक्ष इ.स.१९०८
मध्ये
श्रींच्या
दैवी
अनुग्रहाने
हे संस्थान
स्थापन
झाले आहे.
श्रींनी
आपल्या
दिव्य योग सामर्थ्याने स्वसमाधि
काळ व
स्थळाचा
पुर्वानुमान
व्यक्त
केला होता. ‘या
जागी राहील‘
हे श्रींचे
उद्गार
मोठे सूचक
होते.
श्रींच्या
परमभक्तांव्दारा
शेगांव
येथील कै.
नारायण
कडताजी
पाटील,
यांच्या
अडत
दुकानावर
श्रींचे
भक्त,
गांवकरी व
व्यापारी
यांची एक
संयुक्त
सभा
श्रींच्या
निर्देशानूसार
संवत १८८५
आश्विन शु.१
दि.१२/०९/१९०८
रोजी
आयोजित
करण्यात
आलेली होती.
श्रींच्या
समक्षच
संस्थानच्या
स्थापनेचा
शुभारंभ
झाला. |
|||