अन्न हे पुर्णब्रह्म आहे. पृथ्वीवर राहणारे सर्व
जीव अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नामुळे जगतात व अन्नातच विलीन होतात.
‘‘अन्नं न परिचक्षीत‘‘ अन्नाची अवहेलना करू नका, असा उपनिषेदांचा संदेश
आहे. महाराजांनी हे सत्य उष्ट्या पत्रावळींवरील भातशीते सेवन करण्याचा
कृतीतून दाखविले आहे. तेव्हा अन्न हे ब्रह्म समजून त्याप्रमाणे आपली
कृती झाली पाहीजे.
‘‘शीत पडल्यास दृष्टीप्रत । ते मुखी उचलुनी घालीत
। हे करण्याचा हाच हेत । अन्न परब्रह्म कळवावया ।।
कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती । अन्नम्
बह्मेती ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ।।‘‘
श्रींच्या ‘अन्नम् ब्रह्मेति‘ ह्या शिकवणीनुसार
संस्थानने भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था अखंडपणे सुरू ठेवली आहे.
महाप्रसादासाठी भक्तांचा अखंड ओघ सुरू असतो. जवळजवळ
१०,००० भक्तांना
व्यवस्थितरित्या बसून क्रमाक्रमाने महाप्रसाद ग्रहण करता यावा अशी
वाखणण्याजोगी व्यवस्था या विभागाअंतर्गत केली आहे. हा महाप्रसाद
भक्तांना दररोज सकाळी
१०.०० ते
सायं. ५.०० पर्यंत संस्थान तर्फे विनामूल्य
वितरीत करण्यात येतो. यात
पोळी, भाजी, पिठले , वरण, भात व दररोज एक मिष्टान्न इत्यादिचा समावेश असतो. दररोज
सरासरी ४० ते ४५ हजाराहून अधिक भक्त ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात, हे व
संस्थानच्या इतर सर्व ठिकाणी मिळून दररोज सरासरी
५०,००० हुन अधिक
भक्तांसाठी प्रसाद तयार करण्यात येतो.
श्री प्रगटदिन उत्सव, श्रीराम नवमी व ऋषीपंचमी (समाधि
दिन) ह्या विशेष उत्सवानिमीत्य येणा-या भक्तांसाठी महाप्रसादाची विशेष
व्यवस्था या विभागा अंतर्गत केली जाते. ह्या प्रसंगी सर्व भक्तांना
महाप्रसादाचा लाभ व्हावा, अशी विशेष व्यवस्था करण्यात येते. प्रत्येक
उत्सवादरम्यान साधारणत: १,५०,००० ते १,७५,००० पर्यंत भक्त महाप्रसादाचा
लाभ घेतात हा सर्व प्रसाद हे सेवाधारी उत्साहाने, सेवाभावाने व अत्यंत
शांततामय वातावरणात केवळ १२ तासात तयार करतात.
या महाप्रसादासाठी दरवर्षी
४८,००० क्विंटलहून
जास्त गहू, तांदूळ, साखर व भाजीपाला वापरण्यात येतो.
‘श्रीं‘चा प्रगटदिन व समाधी दिवस तसेच श्रीरामनवमी
या विशेष उत्सवांनिमित्त येणाऱ्या भक्तांच्या अलोट गर्दीसाठी
महाप्रसादाची विशेष व्यवस्था केली जाते. याप्रसंगी सर्व भक्तांना
महाप्रसादाचा लाभ व्हावा यासाठी ‘महाप्रसाद विभाग‘ कार्यरत असतो.
प्रत्येक उत्सवादरम्यान लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
भोजन
व्यवस्था
भोजन व्यवस्थेंतर्गत संस्थानतर्फे दररोज ९,००० हून
अधिक भक्तांच्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था केली जाते. संस्थानच्या
विविध शाखांमधून सरासरी
५०,००० भक्तांचा दररोजचा प्रसाद केला जातो.