मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    
   

श्री हरिहर मंदिर:- 

श्रींनी मोटे यांच्या महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले होते. श्रींचा जुना मठ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्री मोटेंनी संस्थेत विलीन केले असून संस्थानने जुन्या शिवालयाचा जिर्णोध्दार करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधूनश्री विष्णुमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता पर्यंत तीन वेळा या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणुन नावारूपास आले आहे. ज्ञात माहितीनुसार, श्री शिवजी व श्री विष्णुंचे एकत्रित असलेले हे भारतातील एकमेव मंदिर असावे. या मंदिरात श्री गजानन महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते. येथील वास्तव्यात श्रींनी सुकलालची द्वाड गाय तसेच गोविंदबुवांच्या उनाड घोड्याला शांत केले. याच शिवमंदिराच्या सभामंडपात झालेल्या एका कीर्तन प्रसंगी गोविंदबुवा टाकळीकर यांना ‘श्री गजानन महाराज‘ यांनी हंसगीतेचा उत्तरार्ध सांगीतला, तो ऐकून गोविंदबुवांनी महाराजांची महती शेगांवकरांना ऐकवली.