मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    

श्रींच्या पदस्पर्शांने पुनित झालेली शेगांवच्या पंचक्रोशीतील तीर्थस्थळे :-
श्री क्षेत्र नागझरी :- 

श्री क्षेत्र शेगांवपासून अवघ्या ६ कि.मी. अंतरावर मन नदीच्या तीरावर श्री क्षेत्र नागझरी वसलेले आहे. येथे श्री संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. श्री क्षेत्र नागझरी हे नामाभिधान या गावांला श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आणि अखंड झुळझुळ वाहणारे पाण्याचे पवित्र झरे यामुळे पडले आहे. श्री गोमाजी महाराज कृष्णभक्त होते.