मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    

श्रींच्या वास्तव्याने पुनीत झालेली शेगांवातील स्थळे
श्री प्रगटस्थळ : 

माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन शेगांववासियांना घडले ते या भव्य वटवृक्षाखाली.ज्या स्थळी श्रींचे प्रथम दर्शन झाले ती मोटे हवेलीची जागा श्री मोटे यांनी संस्थेत विलीन केली. या ठिकाणी उभारलेली वास्तु प्रगटस्थळ म्हणून ओळखली जाते. श्रींच्या या प्रगटस्थळी संस्थानद्वारा प्रगटस्थळ वास्तू उभारण्यात आली आहे. येथील मेघडंबरीमध्ये श्रींच्या पादुका स्थापित आहेत तसेच येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे शिल्पही साकारण्यात आले आहे. याच जागी संस्थानव्दारा उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह लोकोपयोगी तसेच मंगलकार्यासाठी वापरण्यात येते
.