मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    
 

श्री बंकट सदन : 

संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना श्रींनी प्रथम दर्शन देवून त्यांचेवर कृपा केली. श्रींचे येथे प्रत्यक्ष वास्तव्य होते. या ठिकाणी श्रींनी असंख्य अवतार लीला केल्यात.श्रींचे वास्तव्य लाभलेले हे ‘बंकट सदन‘ पुढे बंकटलालजींच्या वंशजांनी संस्थानचे हाती सुपुर्द केले. त्याठिकाणचे पावित्र्य जोपासले जावे या उद्देशाने संस्थानने या जागेवर एक तीन मजली स्मृतीभवन बांधले असून त्यास बंकट सदन असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी श्रींच्या पादुका व फोटो पलंगावर विराजित आहेत. प्रतिदिन सकाळ-सायंकाळ पूजा आरती केली जाते.