सेवाधारी विभाग

श्री गजानन महाराज संस्थानव्दारे विविध ४२ प्रकारचे सेवाकार्य सुचारू रूपाने राबविण्यात येतात. या सेवाकार्यामध्ये कार्यरत असणारा सेवक वर्ग हा सेवेला आपला जीवनधर्म मानूनच कार्य करतो. या सर्व कार्याचा प्राण म्हणजे सेवावृत्तीने कार्यरत असलेले हजारो हात. केवळ भक्तिभावाने काम करणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता कार्यरत असणारे हजारो सेवेकरी इथे कार्यरत असतात. यात महिलांचाही समावेश असतो. संस्थानच्या सर्व विभागातील लहान-मोठी सर्व कामे हा सेवेकरी वर्गच पार पाडतो. यासाठी एक सक्षम व्यवस्था उभी केलेली आहे. वेगवेगळ्या गावांतून हे सेवकरी येतात. त्यांचे गट केलेले असतात व सेवा ठरलेली असते . मंदिर परिसरात आढळणाऱ्या कमालीच्या स्वच्छतेचे सर्व श्रेय सेवेकऱ्यांनाच द्यावे लागते. 

सेवा रूजू केल्यानंतर सेवेकऱ्यांची काय अपेक्षा असेल? तर फक्त प्रसादाचा नारळ. आपली सेवा संपली की प्रसादाचा नारळ घ्यायचा आणि गावी परतायचे. 

मोबदला मिळतोय म्हणून सेवा करण्याची कुणाचीही भावना नाही. या सेवेकऱ्यांचे वर्णन संतांच्या वाणीत करता येईल. ‘‘भूक भाकरीची, छाया झोपडीची, निवाऱ्यास द्यावी ऊब गोधडीची, मायामोह सारे उगाळून प्यालो, मागणे न काही मागण्यास आलो......‘‘

‘‘पैशाबरोबर अधिकार येतो, कर्तव्याचा मात्र विसर, सेवेत कर्तव्याचे पालन होवून उत्कर्ष होतो, याचा अर्थ या सेवेकऱ्यांकडून उमजतो.‘‘
चांगल्या, निरपेक्ष वृत्तीनं, सेवाभावानं देखील या जगात वावरता येतं हेच त्यांना सुचवायचं आहे संस्थानबद्दल इतकी जागरूकता, प्रेम आणि आदर बाळगणारा हा सेवाभावी वर्ग पाहिला की मन आश्चर्यचकित होतं.

 २५,००० श्रींचे पुरुष व महिला सेवाधारी संस्थानमध्ये भक्तांची सेवा करून व श्रींच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी येतात. हे सेवाकार्य श्रींचे सेवाधारी मोठ्या सेवाभावाने करतात. या व्यतिरिक्त प्रतिक्षा यादीवर श्रींच्या सेवेसाठी जवळ-जवळ ५००० सेवाधाऱ्यांनी सेवा मिळावी म्हणून अर्ज केलेले आहेत.

सेवाधारी गटासंबंधी नियम (सेवेत येण्यासाठी) :

१. सेवाधारी यांचा विनंती अर्ज असावा. 
२. गावातील सरपंच रहिवासी दाखला असावा.
३. सेवाधारी यांच्याकडे पोलीस पाटील यांचा वर्तणूक दाखला असावा.
४. सेवा करण्यासाठी इच्छुक व्यक्तीची वयोमर्यादा २१ ते ४० पर्यंत असावी.
५. त्यांना धार्मिकतेची आवड असावी. तसेच कुठलेही व्यसन त्याला नसावे.


सेवाधारी गावांची यादी