.................................................................................................................................................................................................................................................. श्री गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज येणाऱ्या हजारो भाविकांच्या राहण्याची सोय संस्थानच्या भक्तनिवासात करण्यात आली आहे. त्यांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, या सेवा उद्देशाने संस्थानने ४ भक्तनिवास संकुल उभारले आहेत. मंदिर परिसरातील २ भक्तनिवास व टिनशेड परिसरातील ४ भक्तनिवासात साध्या, डबलबेड, व अटॅच रूम विविध आवश्यक सोईनुसार खोल्या संस्थानने उपलब्ध करून दिल्या आहेत. ही भक्तांसाठी विपुल निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची संस्थानची आगळीवेगळी व्यवस्था आहे. जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या पध्दतीने येथे खोली देण्यात येते. एकाच परिवारातील ३ किंवा जास्त व्यक्तीस नियमाप्रमाणे खोली देण्यात येते. २ व्यक्ती उभयता असल्यास परवानगी घ्यावी लागते. गर्दीच्या प्रसंगी वेळेवर ५००० बेड टाकून भक्तांची निवासाची पर्यायी व्यवस्था हॉलमध्ये केली जाते. समाजातील कोणत्याही स्तरातील भक्तमंडळींना उपलब्धतेनुसार आणि संस्थानच्या नियमानुसार ही सेवा प्राप्त होते. टिप : खालील सर्व ठिकाणी भाविकांच्या सोयीकरीता असलेल्या खोल्या नियमानुसार उपलब्ध होऊ शकतात. भक्तांनी भक्तनिवासामध्ये खोली घेते वेळी कोणतेही शासकीय एक किंवा दोन ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रथम चौकशी पुढे दिलेल्या फोन किंवा मोबाईल नंबर वर करावी.
|
|||||||||||||||