अतिशय नावीन्यपूर्ण इमारतींची रचना असलेले भक्तनिवास संकुल म्हणून आनंदविहार आपला नावलौकिक राखून आहे. या भक्तनिवास संकुलामधील खोल्यांची रचना निवासी घरकुलांसारखी आहे. भव्य प्रवेशद्वारासमोर असलेलं
"विठू माझा लेकुरवाळा" हे भव्य आणि चित्ताकर्षक शिल्प मनाला मोहून टाकतं. परिसरामधील आध्यात्मिक बैठक असलेली नानाविध रंगांची अप्रतिम शिल्पं आपलं लक्ष वेधून घेतात. इथली हिरवाई, प्रशस्त रस्ते, इमारतींची आकर्षक बांधणी, बाह्य व अंतर्गत सजावट पाहून आपण एखाद्या नागरवस्तीतील भव्य गृहसंकुलात आलो आहोत असेच वाटत राहते. भक्तनिवास क्र.
१ ते ११ मध्ये निवासाकरीता ६७७ खोल्या उपलब्ध
आहेत.
चौकशीकरिता फोन नं. ०७२६५-२५२०१९ मोबा.नं. ९६५७४४९४९६