श्री प्रगटदिनोत्सव
श्रीराम जन्मोत्सव
श्री पुण्यतिथी उत्सव (श्री ऋषीपंचमी)
वर्षभरातील विविध उत्सव
श्री प्रगटदिन उत्सव
ऐन तारुण्याभीतरीं। गजानन आले शेगांवनगरी। शके अठराशाभीतरी। माघ वद्य सप्तमीला।।
कोणत्याही उपाधीचें। नांव नव्हतें जवळीं साचें। पात्र पाणी प्यावयाचें। होता एक भोपळा।।
कच्ची चिलीम हातांत। जी होती तयांची स्वकृत। कुंभाराच्या भट्टीप्रत। जिनें नव्हतें पाहिलें।।
नासाग्र दृष्टी मुद्रा शांत। तपोबल अंगी झळकत। प्राचीच्या बालरवीवत्। वर्णन किती करावें।।
संतकवी श्री दासगणू विरचित ‘श्रीगजानन विजय ग्रंथ‘
माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी श्री गजानन महाराज यांचे प्रथम दर्शन शेगाववासियांना घडले. हा दिवस श्रींचा प्रगटदिनोत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाप्रसंगी माघ वद्य १ ते ७ श्रीं महारुद्र स्वहाकाराचे आयोजन करण्यात येते. यागाची पुर्णाहुती व अवभृत स्नान सकाळी १० वाजता होते. दुपारी १० ते १२ श्री प्रगटदिनोत्सवाचे कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता श्रींचा प्रगटदिनोत्सव साजरा करण्यात येतो.
|