![]() |
|||||||
![]() |
|||||||
.................................................................................................................................................................................................................................................. शैक्षणिक कार्य सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यावर मानवाचा उद्धार होतो हे लक्षात घेऊन संस्थानने अनेक उपक्रम राबवले आहेत. सुशिक्षित तसेच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी संस्थानव्दारा संचालीत शैक्षणिक केंद्र कार्यरत आहे.
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
महाविद्यालयाची स्वायत्ततेकडे (अॅटॉनॉमीकडे) वाटचाल होत आहे.
‘श्रीं‘च्या प्रेरणेने, संस्थानच्या शैक्षणिक सेवाकार्यांतर्गत इ. स.१९८३ साली श्रीसंत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. ७२ एकराहून अधिक परिसरात व महाविद्यालयाची अतिभव्य वास्तू उभी असून
विद्यार्थींसाठी ८ वसतिगृहे, अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवणारे ग्रंथालय तसेच क्रीडा मंदिर यांनी परिपूर्ण असलेल्या या महाविद्यालयास संगणक, विद्युत यंत्र अभियांत्रिकी, परमाणू तंत्रज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, एम.बी.ए., एम.सी.ए., एम.इ (इलेक्ट्रीकल्स) व एम.इ. (इलेक्ट्रॉनिक्स) या विषयांवरचे उच्चस्तरीय शिक्षण योग्य, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकाद्वारे दिले जाते. उत्कृष्ट ग्रंथालय, अद्ययावत यंत्रसामग्री, कुशल व शिक्षणप्रेमी प्राध्यापक वर्ग तसेच शिस्तप्रिय
विद्यार्थीं असा अभूतपूर्व संगम या शारदेच्या प्रांगणात झाला आहे.
अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली तसेच टेक्निकल एज्युकेशन
क्वालिटी इंप्रुव्हमेंट प्रोग्रॅम, भारत सरकार यांच्या ‘नेटवर्किंग इंस्टीट्यूशन‘ अंतर्गत निवड झालेल्या आणि आय.सी.एस.-ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड यांनी आय. एस. ओ. ९००१:२००० ने प्रमाणित केलेल्या या महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले असून ए. आय. सी. टी. इ. नवी दिल्ली यांची मान्यता तसेच येथील सर्व अभ्यासक्रमांना प्रत्यायन मंडळ, नवी दिल्ली व
बेंगलोर यांची मान्यता मिळालेली आहे. डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ‘अ‘ दर्जा देऊन गौरविलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्वायत्ततेकडे (अॅटॉनॉमीकडे) होणारी वाटचाल ही विशेष गौरवाची बाब आहे. वाचन संस्कृती वाढावी तसेच तिचे योग्य रीतीने संवर्धन व्हावे यासाठी ग्रंथसंचय तसेच ग्रंथ प्रदर्शन या माध्यमातून संत श्री गुलाबराव महाराज ग्रंथालयात पुस्तके, मासिके, नियतकालिके, अभ्यासोपयोगी जर्नल्स तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित ऑडीओ-व्हिज्युअल कॅसेटस् व सीडीज्च्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. ६५,००० हून अधिक पुस्तके, २५,००० हून अधिक संदर्भ साहित्य, विविध शैक्षणिक विषयांना वाहिलेली अभ्यासपूर्ण मासिके तसेच १,००० हून अधिक सीडीज् व व्हिसीडीज् यांनी परिपूर्ण असलेल्या या ग्रंथालयाद्वारे विद्यार्थींसाठी शैक्षणिक वाचन साहित्यासोबतच हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारे अभ्यासपूर्ण व संस्कारक्षम धार्मिक ग्रंथही उपलब्ध केले जातात. विद्यार्थींचा शैक्षणिक व त्या अनुषंगाने येणारी दृकश्राव्य माहिती सहजरीत्या उपलब्ध व्हावी म्हणून या ग्रंथालयात बहुमजली दालन असून एकाच वेळेस ५०० हून अधिक विद्यार्थीं त्याचा लाभ घेऊ शकतात.
इतर
अभियांत्रिकी महाविद्यालयास भलामोठा कॅम्पस लाभला असून त्यात कॅन्टीन सेवा, पार्किंग सेवा, स्वयंचलित वीज यंत्रणा, दवाखाना, ए. टी. एम. सुविधेसह बँक काऊंटर, अतिथी गृह, ऑडिटोरियम, एस. टी. डी. व आय. एस. डी. सेवा, झेरॉक्स, स्टाफ क्वॉर्टर्स, नर्सरी व प्लॅन्टेशन युनिट अशा विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. |
|||||||
![]() |