|  | |||
|  | |||
| 
 .................................................................................................................................................................................................................................................. संस्थानचे सामाजिक क्षेत्रातील कार्य 
 	
समाजात अनेक मूलभूत समस्या आहेत. या समस्यांतून निरलसपणे, निःस्पृहपणे मार्ग काढीत समाजजीवन अधिक सुदृढ व्हावे त्यासोबतच समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांना जगरहाटीत सन्मानाने जगता यावे यासाठी श्री गजानन महाराज संस्थान 
व्दारा अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध समस्यांचा साकल्याने विचार करून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या अनेकविध प्रकल्पांव्दारे समाजातील दुर्बल व उपेक्षित घटक कसा सक्षम होईल याविषयीचा संस्थानचा ध्यास व कळकळ दिसून येते. 
 
 | |||
|  |