श्री मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

 

दैनंदिन पूजाअर्चा व श्रींचा नैवेद्य विभाग

श्रींचे गादी समोर दुपारी ११ वाजता होणारी आरती

श्री पांडुरंगाची आरती

कापुरार्ती, मंत्रपुष्पांजली

श्लोक

श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती

 

 

श्री पांडुरंगाची आरती

 

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ।।१।। जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ।।धृ।। तुळसी माळा गळां कर ठेवूनी कटीं । कासे पितांबर कस्तूरी लल्लाटी । देवसुरवर नित्य येती भेटी ।। गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।। जयदेव जयदेव ।।२।। आषाढी कार्तिकी भक्त जन येती । साधु जन येती। चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव माधवासी नामदेव, भावें ओंवाळितीं ।। जयदेव जय पांडुरंगा ।।३।।