श्री मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

 

दैनंदिन कार्यक्रम : मंदिरात नित्याची पूजा आणि आरती केली जाते. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

दैनंदिन पूजाअर्चा व श्रींचा नैवेद्य विभाग  

श्रींचे गादी समोर दुपारी ११ वाजता होणारी आरती

श्री पांडुरंगाची आरती

कापुरार्ती, मंत्रपुष्पांजली

श्लोक

श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती

 

 

दैनंदिन पूजाअर्चा व श्रींचा नैवेद्य विभाग : 

 
पहाटे ५.०० वा. श्रींचे समाधिमंदिर व श्रीराम मंदिर मंगलवाद्याचे मंगल वातावरणात भक्तांच्या दर्शनार्थ उघडले जाते.
पहाटे ५.३० वा. श्रींची समाधिमंदिरात व श्रीराम प्रभुची श्रीराम मंदिरात काकडा आरती होते.
 
पहाटे ५.३० ते ७.३० वा. षोडशोपचारे पूजा-पंचामृतपूजा.
रुद्र, ब्रह्मणस्वतीसूक्त, रुद्रसूक्त, सरस्वतीसूक्त, मन्युसूक्त, सौरसूक्त, १२१ अथर्वशीर्षांचे आवर्तन, नैवेद्य व पंचारती.
सकाळी ५.३० ते ७.३० वा. श्रींचे पादुकांवर भक्तांचे स्वहस्ते अभिषेक (अथर्वशिर्षाचे एक आवर्तन) व समाधीस्थानी संस्थानचे उपाध्यायाकरवी अभिषेक
सकाळी ११.०० वा. श्रींची पंचोपचार पूजा, आरती व महानैवेद्य.
दुपारी ४.०० ते ५.०० वा. श्री ज्ञानेश्वरी प्रवचन
सायंकाळी               ५.०० ते ६.०० वा. हरिपाठ
सायंकाळी ५.०० ते ६.०० सुर्यास्ताला गुरूवार, दशमी निमित्त श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा
श्रींची पंचोपचार पूजा व आरती. आरती नंतर नैवेद्य तूपभाताचा.
रात्री ८.०० ते ९.०० वा. भजन व पंचपदी
रात्री ८.०० ते १०.०० वा. कीर्तन (गुरुवार, दशमी, एकादशी, उत्सवप्रसंगी)
रात्री ९.३० वा. श्रींची पंचोपचार पूजा व शेजारती.
 


कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम असल्यास कार्यक्रम संपल्यानंतर शेजारती, तांबूल तयार करून श्रींना विधिवत अर्पण केला जातो व नंतर उपस्थित भक्तगणांना तांबूल प्रसाद देण्यात येतो.

शेजारती नंतर दर्शनबारी मध्ये भक्तअसे पर्यंत मंदिर सुरू असते व नंतर मंदिर बंद करण्यात येते.