श्री मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

 

दैनंदिन पूजाअर्चा व श्रींचा नैवेद्य विभाग

श्रींचे गादी समोर दुपारी ११ वाजता होणारी आरती  

श्री पांडुरंगाची आरती

कापुरार्ती, मंत्रपुष्पांजली

श्लोक

श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती

 

 

श्लोक (वृत्त-शिखरिणी)

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला ।
बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती ।
कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।

श्लोक (वृत्त-भुजंगप्रयात)

सदासर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आता ।।१।।
उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।

अष्टक (दासगणूकृत)

गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशीच अवघें हरी, दुरीत तेंवि दुर्वासना ।।
नसे त्रिभुवनामधे तुजविणे आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करीं ।
तुझी पतितपावना भटकलों वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वासरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
अलास जगी लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरुराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
क्षणांत जल आणिलें नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थला ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
अगाध करणी तुझी गुरुवरा ! न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते अचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
समर्थस्वरूपप्रती धरून साच बाळापुरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरीं ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडता तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितों ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।

श्लोक (वृत्त -इंद्रवज्रा)

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।

प्रदक्षिणा

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।

क्षमापनम्

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् ।
पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।