सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यावर मानवाचा उद्धार होतो हे लक्षात घेऊन संस्थानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सुशिक्षीत तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संस्थानव्दारा संचालीत शैक्षणिक केंद्र कार्यरत आहे.
स्थापना : दिनांक ५ सप्टेंबर १९८८
(नोंदणी क्र. : ०२१२)
‘‘अपंग सेवा हिच ईश्वर सेवा‘‘
संस्थेविषयी :
शेगांव हे विदर्भाची पंढरी म्हणून सर्वत्र ओळखले जाते. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गजानन महाराज संस्थान अनेक लोकोपयोगी सेवा कार्य करीत आहे.
रूग्णसेवा, गोरगरिबांना अन्नदान, दुर्गम भागातील आदिवासी करिता फिरते
रूग्णालय, होमिओपॅथी, अॅलोपॅथी, आयुर्वेदिक दवाखाना,
अपंग पुनर्वसन केंद्र, सार्वजनिक वाचनालय इ.
सेवाकार्ये हाती घेवून संस्थेने आध्यात्मिक व भौतिक गुणांचा समन्वय साधुन आनंदसागर प्रकल्प ही एक वेगळी सौंदर्यकृती जगासमोर निर्माण केली आहे. तसेच विविध आध्यात्मिक शिबीरे, नेत्रशस्त्रक्रिया शिबीरे या सारखी सेवाकार्य हाती घेऊन सामाजिक बांधीलकी स्वीकारली आहे. या शिवाय शैक्षणिक क्षेत्रातही संस्था अग्रेसर आहे. श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, ज्ञानपीठ शाळा, वारकरी शिक्षण संस्था, आदिवासी अंगणवाडी या सारखे शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच सोबत संस्थानने समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या मानसीक विकलांग मुलांकरिता शेगांव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पुर्णपणे सुसज्ज व शैक्षिणक दृष्टया परिपूर्ण व सर्वसोयींनी युक्त असे पहिले मतिमंद विद्यालय दि. ५ सप्टेंबर १९८८ ला सुरू केले. या मतिमंद विद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागातून विद्यार्थी आलेले आहेत. विशेष: ग्रामीण व गरीब समाजातुन आलेल्या मतिमंद मुलांकरिता नि:शुल्क असे हे निवासी विद्यालय आहे.
समाजाची एक गरज म्हणून संस्थेच्या वतीने चालविण्यात येणारे हे एक आगळे-वेगळे पण महान सेवाकार्य आहे.
विद्यालयाची वैशिष्टे :
१. संस्थेच्या मालकीची भव्य सुसज्ज अशी इमारत व पटांगण.
२. प्रशिक्षित व सेवाभावी शिक्षक वृंद.
३. शिक्षण, हलनचलन व्यायाम, विषय अभ्यासक्रम स्वावलंबन कौशल्ये, सामाजिक, बौध्दिक कौशल्य, स्पीच थेरपी व फिजीओथेरपीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणावर भर.
४. विशेष शैक्षणिक साहित्य, मनोरंजन, खेळ साहित्य इत्यादी सर्व साधने शाळेत विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
५. व्यवसायपूर्व शिक्षणामध्ये नारळाच्या दोरीपासून पायपोस तयार करणे, खडू तयार करणे, भेटकार्ड तयार करणे, मेणबत्ती, मेणपणत्या तयार करणे, बुक बार्इंडींग, स्क्रिन
प्रिंटींग, ग्रार्इंडरवर साखर, हळदीपूड मिरचीपूड तयार करणे, शिकवले जाते. दरवर्षी मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविल जाते.
६. शाळांतर्गत विविध स्पर्धांचे
संस्थेव्दारे आयोजन केल्या जाते, समाज कल्याण विभाग (महाराष्ट्र -शासन) कडून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय, विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर विद्याथ्र्यांनी अनेक बक्षीसे पटकावली आहेत, त्याचबरोबर शाळांतर्गत दरमहा स्पर्धा घेतल्या जातात. राष्ट्रीय विशेष ऑलिम्पीक स्पर्धेत ३ सुवर्णपदके व १ सिल्व्हर पदक मिळवून संस्थेचा नावलौकिक केला.
७. विविध शिबिरे, मेळावे आयोजित केले जातात. या विदर्भ खान्देशस्तरीय, विदर्भ खान्देश, मराठवाडास्तरीय अशी दोन चर्चा शिबीरे, पालक मार्गदर्शन मेळावा व भावंडाचा मेळावा यासारखे उपक्रम राबचून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाते. २००४ मध्ये राज्यस्तरीय चर्चा शिबिरात, पालक, शिक्षण, संस्थाचालकांचे प्रचंड संख्येने सहभाग.
८. गायन, चित्रकला स्पर्धेतून राज्यस्तरावर विद्याथ्र्यांनी ३ सुवर्ण पदके व प्रथम क्रमांकाची बक्षीसे पटकाविली आहेत. नाट्यकला स्पर्धेत राज्यस्तरावर बक्षीसाचे मानकरी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम
वर्षभरात विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत विद्यालयाने डिसेंबर २००७ या वर्षी चीन मधील शांघाय येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतीक विशेष ऑलम्पीक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या जागतिक अॅथलेटीक खेळ स्पर्धेत जगातील १६० देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. त्या ठिकाणी पार पडलेल्या १०० मी. धावणे, २०० मी. रिले रेस या स्पर्धेत विद्यालयाच्या चि. केतन मुकेशचंद संचेती या विद्याथ्र्यांने प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक पटकावून विश्वविक्रम नोंदवीला आणि संस्थेचे व विद्यालयाचे नांव जागतीक स्तरावर पोहचविले आहे.
९. मानसोपचार तज्ञ डॉ. प्रमोद ठाकरे, अकोला, महिन्यातुन एक वेळा तर डॉ. मुकूंद सावजी १५ दिवसातून एकदा मुलांची शारीरिक तपासणी करुन औषधोपचार करतात. अकोला येथी होमिओपॅथी तज्ञांकडून मुलांची तपासणी केली जाते व राजा फार्मसीकडून विनामुल्य औषधोपचार केला जातो. दररोज संस्थचे फिरते रुग्णालय येऊल
विद्यार्थींची तपासणी केली जाते. संस्थेत २४ तास परिचारिकांची सेवा उपलब्ध करुन दिली जाते.
१०. दरमहा पहिल्या रविवारी पालकसभा आयोजित करुन पालकांचे प्रश्न सोडवले जातात.
११. निवासी मुलांची राहणे व जेवणाची सोय मोफत केली आहे.
१२. विद्यार्थींना थ्थी बस प्रवास सवलत, रेल्वे प्रवास सवलत व इतर सर्व सवलती विद्यालयाकडून मिळवून दिल्या जातात.
१३. विविध धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.
१४. मुलांचा शारिरिक विकास व्हावा व धैर्य, साहस, आत्मविश्वास यावा म्हणून अजिंक्य फिटनेस अॅडव्हेंचर ग्रुप द्वाराआयोजित गिर्यारोहणाकरीता मुलांना विविध ठिकाणी पाठविले जाते. २००५ मध्ये मनाली येथे १२५०००० फुटावर गिर्यारोहण करुन विद्याथ्र्यांनी संस्थेचा झेंडा फडकवला.
१५. शाळेची विद्यार्थीं मंजुर संख्या : निवासी -५०, अनिवासी -१२, इतर -६२ असून सद्या एकूण ११९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शैक्षणिक प्रगतीचा आढावा
विद्यालयात आज रोजी ६२ विद्यार्थी असून त्यांच्या बुध्यांकानुसार दहा गट केलेले आहेत. शिक्षक, शिक्षकेतर असे एकुण २७ कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यालयाची वेळ सकाळी १०:३० ते ५:३० असून प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम मूलभूत कौशल्यावर आधारित आहे. यामध्ये लेखन, वाचन, सोपे जीवन व्यवहार, सामान्य व्यवहार, सामान्य ज्ञान, स्वच्छता, पैश्याचे व्यवहार, चित्रकला, हस्तकला, खेळ, कवायती, योगासने दरमहा पाठांतर स्पर्धा, खेळ स्पर्धा हे सर्व विषय
प्रशिक्षित शिक्षकांकडून शिकविले जातात. यामुळे मुलांची प्रगती उत्तरोत्तर होत जाते. शाळेत मुलांसाठी वाढदिवस, सहली, जागतिक अपंग दिन, राष्ट्रीय नेत्यांची जयंती, पुण्यतिथी, रक्षाबंधन सारखे विविध सण व उत्सव साजरे केले जातात.
वसतिगृह :
१५ जुलै १९९१ पासून आसपासच्या ग्रामीण भागातील मतिमंद मुलांना शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून संस्थेने वसतिगृह सुरू केले. वसतिगृहात आज ६२ विद्यार्थी राहतात. त्यांच्या निवास व भोजनाची मोफत सोय संस्थेने केलेली आहे. तसेच औषधोपचार, सेवाभावी कर्मचारी वर्ग, पौष्टीक व पोषक आहार इत्यादी सर्व सोयींनीयुक्त असे वसतिगृह संस्थानने सुरू के ले आहे.
प्रवेशासंबंधी अट
१. प्रवेशित, मतिमंद असावा. प्रवेश घेते वेळी मनोविकार तज्ञ व जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
२. जन्म तारखेचा दाखला
३. रहिवासी दाखला
४. उत्पन्नाचा दाखला
५. ८ पासपोर्ट साईज फोटो
६. प्रवेशित ६ ते १८ वयोगटातील असावा.
वसतिगृहासाठी
१. विद्यालयातील सर्व विद्याथ्र्यांना प्रवेशाचे नियम व अटी लागु राहतील.
२. वसतीगृहासाठी मुलींकरीता ६ ते १२ वयोगट असावा.
३. मुलांचे वर्तन योग्य असावे. त्यास प्राथमिक विधी संबंधी स्वच्छता स्वत:करता येणे आवश्यक आहे.
४. वसतिगृहातील शिस्त व नियम पाळणे मुलांस बंधनकारक राहील.
५. मुलांस दिर्घकाळ असणारा आजार,
सांसर्गिक रोग, फिटस इत्यादी असतील तर प्रवेश देता येणार नाही.
६. दर महिन्याला पहिला रविवार मुलांच्या भेटीकरिता आहे. वरील अटीशिवाय इतर सर्व माहिती प्रवेश घेत वेळी विद्यालयाच्या कार्यालयात मिळेल.
कार्यालयाची वेळ
सकाळी ११ ते ५ (शनिवार - सकाळी ८ ते १२)
: पत्ता :
श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय, शेगांव
आनंदविहार संकुल
वॉटर सप्लाय समोर, बाळापूर रोड, शेगांव
ता. शेगांव जि. बुलडाणा ४४४२०३,
महाराष्ट्र
फोन नं. ०७२६५-२५२६०२