............................................................................................................................................................................................................................................... श्री क्षेत्र कपिलधाराप्रमाणे हे क्षेत्रही निर्जन, शांत आणि दाट वनराईतील. तपसाधनेसाठी उत्तम. त्यामुळे हे ठिकाणही ‘साधना स्थळ‘ म्हणून तयार करण्यात आले आहे. आनंद सागरच्या धर्तीवर येथे ध्यानकेंद्र उभारण्यात येत आहे. विशेषत: सर्व पंथीय साधुसंताना तपसाधना करण्याच्या दृष्टीने हे योग्य ठिकाण आहे. त्यांच्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज असे तपस्वी निवास उभारण्यात येत आहे. सध्या येथील बांधकाम सुरू असून साधना मंदिर उभारलेले आहे. शिवाय फिरत्या रुग्णालयाचे तपासणी केंद्र आहे. शहरी धावपळीपासून दूर असलेल्या या शांत, रम्य आणि पवित्र जागेला साधना स्थळ म्हणूनच तयार करण्याचे योजलेले आहे.
श्रीक्षेत्र गिरडा व कपीलधारा येथील शाखांचे कार्य कार्यान्वित झाले आहे. खालील निर्देशित प्रकल्प कार्यान्वित करण्याचा संस्थानचा मानस आहे. सदर प्रकल्प योजना सर्वधर्म, वंश व जातीचा भेदभाव न ठेवता सर्वांसाठी राबविली जाईल.
|
||||||||||