श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर क्षेत्री शिवभक्तांची गर्दी नित्याचीच. या भक्तांच्या सेवेसाठी आणि येथील वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी संस्थानने १९९५ साली येथे शाखा सुरू केली.
येथे
श्रींच्या
संगमरवरी
स्मृतिभवनाचे
काम पूर्ण
होऊन
श्रींच्या
मुर्तिची
विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली आहे. अत्यंत कलाकसुरीने युक्त धोलपूरी दगडाच्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होऊन येथे एकूण ४ भक्तनिवासात १७७ खोल्या प्राथमिक सोईयुक्त. सोबतच ३०० बेडची पर्यायी निवास व्यवस्था. प्रवेशव्दारातून दिसणारे भव्य संगमरवरी मंदिर आणि येथील रम्य, शांत परिसर भक्तांना भावला नाही तरच आश्चर्य. मंदिरात महाराजांची तीनही वेळची आरती, पूजा, अभिषेक पुजाऱ्यांमार्फत केली जाते. चतुर्थी, एकादशी आणि गुरूवारी भजन होते. प्रगटदिनी पारायण, हरिपाठ, महाप्रसाद (मसालेभात, बुंदीलाडू ) वितरण होते. पौष महिन्यात निवृत्ती महाराजांच्या वारीला दशमी, एकादशी, द्वादशी या तीन दिवशी उत्सव साजरा करण्यात येतो आणि तीनही दिवस श्री निवृत्तीनाथ मंदिर येथे व श्री शाखेमध्ये १,००,००० भाविकांना विनामुल्य महाप्रसादाचे मिष्ठान्नासह वितरण होते. शिवाय वारकऱ्यांना भजनी साहित्याचे वितरण होते. आजपर्यंत येथे
८०४ दिंडयांना भजनी साहित्य वितरीत करण्यात आले आहे.
या भक्तांच्या निवासासाठी, उदरभरणासाठी अत्यल्प देणगीत व्यवस्था पुरवली जाते. शिवाय प्रवेशव्दाराच्या बाहेर पार्किंगसाठी जागा आहे. याच जागेत भक्तांची निवास व्यवस्था होईल एवढा हॉल आहे.
आदिवासी बांधवांकरीता फिरते रूग्णालय व दिवाळी निमित्य कपडे व महाप्रसाद मिष्ठान्नासह वितरण केल्या जाते. यावेळी २५,००० आदिवासी बांधवांना महाप्रसाद मिष्ठान्नासह कापडाचे वितरण करण्यात आले.