............................................................................................................................................................................................................................................... श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र आळंदी
विठूभक्तांचे आणखी एक पवित्र स्थान म्हणजे ज्ञानेश्वरांची आळंदी. ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि भागवत धर्माचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा याकरिता या क्षेत्राची शाखा म्हणून निवड करण्यात आली.
१९९८ साली येथे तीन इमारती बांधून शाखेचे काम सुरू करण्यात आले होते. श्रींच्या
मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे तसेच अत्यंत कलाकुसरीने युक्त धोलपूरी दगडाच्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. येथे एकूण ४ भक्तनिवास १०५ खोल्या प्राथमीक सोयीयुक्त. सोबतच २०० बेडची पर्यायी निवास व्यवस्था. भक्तनिवासाच्या पलीकडे चढणीवर हे
भव्य संगमरवरी मंदिर उभारण्यात
आले आहे. राजस्थानहून बोलावलेले खास
कारागिरांनी मंदिर उभारणीचे आणि त्यावरील कलाकुसरीचे काम
केल आहे. खाली सभामंडप आणि वरच्या बाजूला महाराजांची मूर्ती असे या मंदिराचे स्वरूप आहे.
या प्रवचन हॉलमध्येच महाराजांची तसबीर, पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. या प्रवचन हॉलमध्ये भक्तगण नामस्मरण, पारायण करतात. श्री क्षेत्र आळंदी भजनी साहित्य वितरणाविषयी : श्री गजानन महाराज संस्थान, तर्फे श्री क्षेत्र शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उत्सव- वारी प्रसंगी श्री भागवत धर्म प्रचारार्थ, भजनी साहित्य व संत वाङमयाचे सेवार्थ वितरण करण्यात येते. तसेच कार्तिक वद्य वारीप्रसंगी शाखा श्री क्षेत्र आळंदी येथे भजनी साहित्य व संतवाङमयाचे सेवार्थ वितरण करण्यात येते.
|
||||||||||