श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र ओंकारेश्वर :
मध्यप्रदेशमधील नर्मदा तीरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र. येथे संस्थानची शाखा कार्यरत असून श्री क्षेत्रओंकारेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी येथील चार एकर जमिनीवर शाखेचे काम सुरु झाले आहे. येथे श्रींच्या संगमरवरी स्मृतिभवनाचे काम पूर्ण होऊन श्रींच्या
मूर्तिची विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली आहे. अत्यंत कलाकसुरीने युक्त धोलपूरी दगडाच्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. येथे एकूण ४ भक्तनिवासात १०४ खोल्या प्राथमीक सोयीयुक्त उपलब्ध असून सोबतच २०० बेडची पर्यायी व्यवस्था आहे.
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांवव्दारा
श्री क्षेत्र ओंकारेश्वर (म.प्र.) येथे राबविण्यात येणारे सेवाकार्ये :
अॅलोपॅथी दवाखाना
श्री नर्मदा परिक्रमा मार्गावर पिण्याचे पाणी (प्याऊ)
श्री नर्मदा जयंती, महाशिवरात्री व श्रींच्या प्रगटदिनानिमित्त भक्तांना रुग्णसेवेसाठी धर्मार्थ दवाखाना व महाप्रसाद मिष्ठान्नासह वितरण केल्या जाते.
कार्तीक मेळा प्रसंगी ३००० पंचक्रोशी परिक्रमावासींकरिता नि:शुल्क निवास व्यवस्था, भोजन, कापड वितरण, औषधोपचार इत्यादीची व्यवस्था केली जाते.
नर्मदा परिक्रमा करणाऱ्या यात्रींची संस्थानच्या शाखेमध्ये तीन दिवस पावेतो भोजन, निवास व औषधोपचाराची व्यवस्था सेवार्थ करण्यात येते.
श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे येणाऱ्या भक्तांकरीता अल्प देणगीमध्ये चहा, नास्ता, भोजन, निवास इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत.
श्री नर्मदा जयंती, श्री महाशिवरात्री व श्रींच्या प्रगटदिना निमीत्त १ लाख भक्तांना मिष्टान्नासह महाप्रसाद वितरण व यात्रेकरूंकरीता सेवार्थ फिरते रूग्णालय आदी सुविधा देण्यात येतात.